Header Ads Widget


आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींविरूध्द गुन्हा दाखल.

 

LiveNationNews Bulletin

नागपूर शहर, दि. ०६/०२/२०२३.
पो.ठाणे अंबाझरी हद्दीत अंबाझरी तलाव येथे फिर्यादीची मुलगीने तीची मुलगी हिचेसह अंबाझरी तलावाचे पाण्यात उडी घेवुन आत्महत्या केल्याने पो.ठाणे अंबाझरी येथे अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2019 ते दि. 03.02.2023 पावेतो फिर्यादीची मुलगी मृतकला आरोपी क्र. 1) तीची सासु , 2) सासरा , 3) दिर, 4) पति व 5) ननद यांनी संगणमत करून फिर्यादीचे मुलीस लग्न झाल्यानतंर वारंवार माहेरून पैश्याची मांगणी करून तीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच फिर्यादी हीने या पुर्वी आरोपींविरूध्द दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देवुन तिला मारहाण केली होती. आरोपी हे रायटाउन, ईसासनी येथे फिर्यादीची मुलगी राहत असलेले घर खाली करण्यासाठी फिर्यादीचा पती व नातेवाईक दोन महीण्या पासुन फिर्यादी व तिची मुलगी खुशी हीला सोडुन आमला येथे राहत होते व घर खाली करण्यासाठी धमकी देत होते.
आरोपींनी दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळुण फिर्यादीचे मुलीने तिचे मुलीसह तलावाचे पाण्यात उडी घेवुन आत्महत्या केली. मृतक हिला आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पो.ठाणे अंबाझरी येथे सपोनि बोयणे. यांनी आरोपींविरूध्द हुंडा प्रतिबंधक कायदाअन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Tuesday, April 15. | 7:07:49 AM