Header Ads Widget


वाहन चोरांना अटक, 7,35,000/- रू चा मुद्देमाल जप्त .

 

नागपूर शहर, दि. ०६/०२/२०२३.
पो.ठाणे हुडकेश्वर हद्दीत, येथे राहणारे फिर्यादीनी त्यांची हुंडई आय-20, मॅग्ना कार क्र. एम.एच. 49 ए.ई 1928 मॅटेलीक सिल्वर रंगाची किमती 3,00,000/- रू ची घरासमोर लॉक करून पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद कार चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.ठाणे हुडकेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हुडकेश्वर पोलीसांनी गुन्हयाचे तपासादरम्यान गुप्त बातमीदारांचे माहीती वरून व तांत्रीक माहीती वरून आरोपीस ताब्यात घेवून बारकाईने विचारपुस केली असता आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करून न्यायालयातून पि.सी.आर घेवून त्यांस अधिक सखोल विचारपूस केली असता आरोपीने त्याचा साथिदार एका विघीसंघर्षग्रस्त बालका सोबत गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपी क्र. 2) पो.स्टे.अजनी याने त्या गाडीची चाबी गाडीमालक त्याचे नातेवाईक हयातील फिर्यादी हयांचे घरून चोरून ति चाबी गाडी चोरण्याकरीता विघीसंघर्षग्रस्त बालकास दिली असे सागीतले. गाडी चोरून नंतर विकून त्यातील पैसे आम्ही आपसात वाटून घेणार होतो असे सागीतले. आरोपी क्र. 2) यास अटक करण्यात आले.
ह्यातील आरोपी हा सराईत गून्हेगार असून त्याचे विरूध्द नागपूर शहरात वाहन चोरीचे बरेचसे गून्हे दाखल आहेत. सदर गून्हयाचे तपासा दरम्यान आरोपी क्र. 1 याचे कडून पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील एकुण तीन गुन्हे व अमरावती येथील पोलीस ठाणे फ्रेझरपूरा येथील तीन व राजापेठ येथील एक असे चार गुन्हे व पोलीस ठाणे पुलगाव येथील एक असे एकुण आठ गुन्हे उघडकीस आणुन त्याचे ताब्यातुन 1) हूंन्डई कंपणीची आय 20 मॅग्ना कार क. एम एच 49 ए ई 1928 सिल्हर रंगाची कि. 3,00,000/रू 2) एक सूझूकी झिथ्सर टू व्हीलर गाडी क्रं. एम.एच-27-डी.सी-3634 कि. 1,50,000/रू 3) एक हिरो पॅशन प्रो. गाडी क्रं एम.एच.-27-सी.के-8164 कि. अंदा. 50,000/रू 4) एक अक्टीवा 5 जि गाडी क्रं. एम.एच.-27-सी.पी-2638 कि. अंदा. 60,000/रू 5) एक अॅक्टीवा 5 जी. एम.एच.-32-ए.पी-5312 कि. अंदा. 60,000/रू 6) एक अक्टीवा गाडी क्र.एम.एच.-49-एन-7032 कि. अंदा. 30,000/रू 7) एक स्पेल्डर गाडी क्रं.एम.एच.-32-ए.टी-6081 कि. अंदा.70,000/रू 8) एक होन्डा शाईन गाडी क्रं एम.एच.-27-बी.पी-1159 कि. अंदा. 15,000/रू असा एकुण किमती 7,35,000/रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पोउपआ. श्री विजयकांत सागर परि क्र. 04, सपोआ डॉ. श्री. गणेश बिरादार अजनी विभाग यांचे मार्गदर्शनात वपोनि ललीत वर्टीकर, पोनि गुन्हे विक्रांत सगने, पोउपनि प्रमोद खंडार, सफौ. शैलेश ठवरे, नापोअं. आशिश तितरमारे, राजेश मोते, दिपक तर्हेकर, राजेश धोपटे, मूकेश कन्नाके, गणेश बोन्द्रे, चंद्रशेखर कौरती, विजय सिन्हा, पो.अं. प्रदीप भदाडे, कूणाल उइके, रविन्द्र वंजारी यांनी केली.

Post a Comment

0 Comments

|