शहादा प्रतिनिधी : नंदुरबार जिल्यातील शहादा तालुक्यात डोंगरगाव, वडछील येथील सरकारी पड राखीव वनविभागाच्या गौण खनिज स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदाराने महसूल व वनविभागाच्या अधिकारयांच्या संगनमताने लाखो टन गौण खनिज माती, मुरुम, दगड, बेकायदेशीर रस्ताच्या कामासाठी एन. एस. ६१बी आमलाड मोड बोराद ते शहादा जिल्हा सिमा रोड स्टेट हायवे च्या कामावरती इतर ठिकाणी गौण खनीज वापरण्यात आला त्याबद्दल दोषी ठेकेदारासह महसूल व वनअधिकान्यांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकते नंदकुमार पुंडलीक तवर व कृष्णा ब्रिजलाल निकम यांनी विभागीय आयुक्त महसुल व वने नाशिक आणि जिलाधिकारी नंदुरबार यांच्या कडे पुराव्यासह तक्रार देऊन मागणी केली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की,
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा डोगरगाव वडटिल च्या हद्दीत सरकार पड़ राखीव वनक्षेत्र गट नं. २९०, २९३,२७९ व इतर गटात में स्वस्तिक इंफ्रा लॉजिक (आय) प्रा.लि. मुंबई च्या ठेकेदाराने महसुल व वनाधिकान्यांच्या संगनमताने लाखो ब्रास गोण खनीज नव्हे तर लाखो टन गौण खनीज बेकायदेशीर में, स्वस्तिक कंपनीच्या स्टोन क्रेशरसाठी वापरून रस्ता क्र. एन. एस. ६१वी आमलाड मोड बोराद ते शहादा जिल्हा सिमा रोड स्टेट हायवे च्या कामावरती व इतर ठिकाणी दिवसा ढवळ्या रात्र दिवस माती, मुरुम दगड सरळ सरळ वापरण्यात आला तरी या गोण खनीज चोरी संदर्भात सामाजिक कार्यकर्ता नंदकुमार पुंडलीक तवर व कृष्णा ब्रिजलाल निकम यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५ अंतर्गत हा प्रकार उडकीस आणला आहे. त्या ठिकाणी गौण खनिज चोरी संदर्भात संपूर्ण पुराव्यासह तक्रार मा. विभागीय आयुक्त, महसुल व वने, नाशिक मा.गमे साहेब व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे तक्रार करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात गौण खनिज काढतांना में, स्वस्तिक कंपनीच्या ठेकेदारांनी व महसूल वनअधिकाऱ्यांनी कोणतीच पूर्व परवानगी केंद्र व राज्य शासनाची घेतलेली नाही. तसेच शहादा तालुका हा पूर्वीपासून रिझर्व फॉरस्ट असतांना भारतीय वन कायदा १९२७ प्रमाणे डोंगरगाव वडछिल चा सहकारी पड जमीन गट नं. २९०,२९३, २७९, व इतर डोंगराचे जमीनी वनविभागाच्या मालकीची असतांना हा एवढ्या मोठ्या प्रमाणात गौणखनीज उचललाच कसा? हा पण चौकशीचा भाग आहे. असे असतांना ही जमीन आदिवासी शेतकऱ्यांना भोगवटादार २ म्हणून पोट भरण्यासठी वाटप करण्यात आली आहे. त्या जमीनीचा शेतकन्यांना ज्या प्रयोजनासाठी दिली आहे. त्या प्रयोजनाचा वापर न करता व्यापारी तत्वावर गोणं खनीज हे स्वस्तिक कंपनीला उत्खनन कसे करू दिले हे संपूर्ण प्रकरणाची तात्काळ कायदेशीर चौकशी करुन ठेकेदाराम व वनाधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता नंदकुमार पुंडलीक तवर व कृष्णा ब्रिजलाल निकम यांनी केली आहे.
0 Comments