Header Ads Widget


अवैध्यरित्या गांजाच्या झाडांची लागवड करणाऱ्या इसमास अटक.

 

सातारा, दि. १४/०२/२०२३.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अमली पदार्थाची विक्री, वाहतूक, लागवड करणारे इसमांचेविरुध्द कारवाया करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना मातारा जिल्हयातील अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, लागवड करणार करणारे इसमांची माहिती प्राप्त करून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, लोणार खडकी ता. माण गावातील एका इसमाने त्याचे डाळींबाचे शेतामध्ये गांजाच्याची विक्री करण्याकरीता लागवड केली आहे, अशी माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे पथकास प्राप्त झाले माहितीचे ठिकाणी जावून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने प्राप्त माहितीच्या ठिकाणी लोणार खडकी माण जि.सातारा गाव हद्दीतील डाळीयांच्या शेतामध्ये जावून पाहणी केली असता शेतामध्ये गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. त्या शेतामध्ये उभ्या असलेल्या इसमास सदरचे शेत कोणाचे आहे? याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचे शेत त्याच्या स्वतःच्या मालकीचे असल्याचे सांगून तोच या लागवड केलेल्या गांजाच्या झाडांची जोपासणा करीत असल्याचे सांगीतल्याने सदरची लागवड जोपासणा केलेली १३३१ गांजाची झाडे पथकाने मुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार ताब्यात घेवून त्याचे वजन केले असता त्याचे वजन ४२३०० इतके आहे. जत करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत १,०५,७५,५००/- रुपये ( १ कोटी ५ लाख ७५ हजार ५०० रुपये) इतकी असून नमुद वर्णानाची व किमतीची गांजाची झाडे त्या इसमाने त्यांच्या मालकीच्या डाळींबाच्या शेतात लागवड जोपासणा केल्याचे आढळून आल्याने त्याचे विरुद्ध म्हसवड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.यापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार अतिश पाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, मुनीर मुल्ला, स्वप्नील माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, धीरज महाडीक, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, संभाजी साळुंखे, पंकज बेसके फोरन्सिक विभागाचे राजीव कुंभार, अनिल खटावकर, रुद्रायन राउत म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार नारनवर, काकडे, भादुले यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

|