Header Ads Widget


अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन आरोपी विरुध्द कारवाई …

 

दिनांक :- 14/02/2023 , पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर
नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन 06 आरोपी विरुध्द कारवाई करुन 1,92,000/- (एक लाख ब्यान्नव हजार) रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने 3,400 लिटर कच्चे रसायन व 220 लिटर तयार दारु नाश स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई केली आहे .
श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/बबन मखरे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, पोकॉ/मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, रोहिदास नवगिरे, मपोना/भाग्यश्री भिटे व चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.10/02/23 ते दि.12/02/23 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवुन 06 ठिकाणी छापे टाकुन एकुण 1,92,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 3,4000 लि. कच्चे रसायन, 220 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त व नाश करुन खालील प्रमाणे 06 आरोपीं विरुध्द नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग व मा. श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments

|