Header Ads Widget


साक्री तालुक्यातील काकरदा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ....

प्रतिनीधी/अकिल शहा 
साक्री : काकरदा ता. साक्री येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ झाला. धुळे जि. प. कृषी, पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या शुभहस्ते स्पर्धाचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातून अनेक संघांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, भाजपा आदिवासी आघाडीचे अध्यक्ष रामलाल जगताप, महिर चे सरपंच रमेशभाऊ सरक, नवापाडा चे सरपंच संजय गांगुर्डे, काकरदे च्या सरपंच लक्ष्मी गवळी, उपसरपंच सुनिल कामडे तसेच परिसरातील अनेक सरपंच उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय आश्रमिय क्रीडा स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धामध्ये प्रथमच राईनपाडा येथील शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता आठवी ची विद्यार्थीनी कु. गीता शांताराम राऊत हिने सतरा वर्ष वयोगटातून लांब उडी क्रीडा प्रकारात तालुका  प्रकल्प  विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये प्रथम प्रविण्याने यश संपादन करून सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल  हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते सत्कार करून विशेष कौतुक करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशीतील व गावातील असंख्य खेळाडू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Friday, January 3. | 2:17:45 AM