Header Ads Widget


साक्रीत संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी...

प्रतिनीधी/अकिल शहा

साक्री : गेल्या अनेक वर्षांपासून साक्री शहरात धोबी‎ परीट वरठी समाज संघटनेच्या वतीने आणि संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा‎ समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे‎ आयोजन करून संत गाडगे बाबा जयंती‎ उत्साहात साजरी केली जाते त्यानुसार आज दि.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी साक्री शहरातील बस स्टैंड जवळ च्या परिसरात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले व तसेच ग्रामीण रुग्णालय, साक्री येथे रुग्णांना मोफत फळ वाटप करण्यात आले.
    संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन धोबी परीट महासंघाच्या वतीने पदाधिकारी यांनी केले, कार्यक्रमाला साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनगराध्यक्ष बापू गीते, भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक गजेंद्र भोसले, समाजसेविका जोशीला ताई पगारिया, साक्री तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबा सोनवणे,जन ग्रामीण पत्रकार महासंघाचे साक्री तालुका अध्यक्ष  प्रकाश वाघ, पत्रकार जी. टी. मोहिते,साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शरद वाघ व तसेच साक्री शहरातील धोबी परीट समाजातील सर्व बांधव भगिनी व तसेच सर्व समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|