प्रतिनिधी/ शहादा
संस्कार व संगत महत्त्वपूर्ण गुण ज्याच्या अंगी आहे तो व्यक्ती आयुष्यात मोठा झाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन ह.भ. प आचार्य अनिल जी महाराज यांनी भागवत प्रसंगी केले.
यशोधन कॉलनी मध्ये श्रावगे परिवारातर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कंचन खेडी (मध्य प्रदेश राज्यातील ) येथील भागवताचार्य अनिल जी महाराज यांच्या सूश्राव्यवाणीतून भागवत कथा सुरू आहे. पुढे बोलताना महाराज म्हणाले की आत्ताच्या लग्न सोहळा पारंपारिक पद्धतीने न होता त्यामध्ये देखील संस्कृतीच्या रहास होत आहे. संस्कृती जपताना जुन्या काळी होणारे विवाह मोठ्यांच्या आदर हा महत्वपूर्ण होता व आहे. आता सध्या तो दिसत नाही आधुनिकीकरणाकडे समाजाची वाटचाल होत आहे त्यामुळे संस्कृती ही लयास जात आहे.
आपली संगत कोणाजवळ आहे यावर आपले करिअर ठरत असते. यासाठी आपले खान पण आपले वागणे हे महत्त्वपूर्ण असते. भागवत सप्ताह मध्ये रुक्मिणी स्वयंवर याच्या जिवंत देखावा साजरा करण्यात आला यावेळी बोलत असताना संपूर्ण सभा मंडप मंत्रमुग्धपणे ऐकत होते . अधून मधून भक्तीमय संगीतात सर्व भाविक भजनाच्या लाभ घेऊन नाचत होते.
यावेळी श्रावगे परिवारातर्फे महाराजांच्या हस्ते विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या मंडळाच्या व व्यक्तींच्या सत्कार करण्यात आला. संकल्प ग्रुप ने केलेले कार्याची दखल घेऊन सर्व सभासदांच्या व आई म्हासळसादेवी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सुरू असलेले कार्याची दखल घेत म्हाळसा देवी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांच्या देखील सत्कार करण्यात आला.
0 Comments