नंदुरबार प्रतिनिधी : प्रफुल्ल माळी - स्पेसल क्राईम रिपोर्टर :
दिनांक 14/02/2023 रोजीचे 23.00 ते दिनांक 17/02/2023 रोजी सकाळी 07/00 वा. दरम्यान श्री. नारायण जगन्नाथ गायकवाड यांचे तळोदा तालुक्यातील तळवे गावातील राहते घराच्या दरवाजाचे कुलुप कडीकोयंडा अज्ञात आरोपीतांनी तोडुन 86,450/- रु कि. सोने, चांदीचे दागिने चोरुन नेले म्हणून तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गु.र.नं. 41/2023 भा.दं.वि. कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील तळवे गावासारख्या ग्रामीण भागात झालेल्या घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सदर घटनेबाबत तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पंडित सोनवणे यांनी सदर घटनेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पंडित सोनणे व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तळोदा पोलीस ठाण्याचे वेगवेगळे पथके तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
दिनांक 20/02/2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अक्कलकुवा गावातील सोरापाडा परिसरात राहणारा शिकलीकर तरुण अक्कलकुवा गावातील मोलगी नाका परिसरात सोन्याची लगड व चांदीचे काही दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने संशयीतरित्या फिरत आहे अशी बातमी मिळाली. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील अंमलदारांना सदरची माहिती सांगून संशयीत तरुणाला ताब्यात घेवून विचारपुस करणेबाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ अक्कलकुवा गाठून तेथे मोलगी नाका परिसरात साध्या वेशात सापळा रचून संशयीत इसमाचा शोध घेतला असता एका चहाच्या दुकानावर एक शिकलीकर तरुण दिसून आला. सदरचा संशयीत आरोपी सराईत असल्यामुळे अत्यंत हुशार व चलाख होता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने लावलेला सापळा मजबुत असल्याने त्यास पळुन जाता आले नाही व तो पोलीसांच्या सापळ्यात अडकला व पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने दर्पनसिंग धरमसिंग शिकलीकर वय-22 रा. सोरापाडा ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार असे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून सोन्याची लगड व चांदीचे दागिने मिळून आले. त्यास दागिन्यांबाबत विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देवू लागला, म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने 4 ते 5 दिवसापूर्वी तळवे येथे एका बंद घराचे कुलुप तोडून लोखंडी कपाटातून सोने, चांदीचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत तळोदा पोलीस ठाण्याचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता तेथे तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गु.र.नं. 41/2023 भा.दं.वि. कलम 454,457,380 प्रमाणे दिनांक 17/02/2023 रोजी गुन्हा दाखल आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडून 1,62,918/- रु. कि. चे सोन्याचे दागिने कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे. दर्पनसिंग धरमसिंग शिकलीकर वय-22 रा. सोरापाडा ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार व जप्त मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी तळोदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
तसेच ताब्यात घेण्यात आलेला दर्पनसिंग धरमसिंग शिकलीकर वय-22 रा. सोरापाडा ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार याच्या गुन्हे अभिलेखाची माहिती घेतली असता, त्याचेवर मध्य प्रदेश राज्यातील खेरगोन व बडवाणी जिल्ह्यात त्याचप्रमाणे दिल्ली येथे मालमत्तेविरुध्द्चे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजुन आले आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, पोलीस हवालदार सजन वाघ, मुकेश तावडे, पोलीस नाईक मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments