Header Ads Widget


मोटार वाहन निरीक्षक व खाजगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

नाशिक, दि. २२/०२/२०२३

आरोपी महेश हिरालाल काळे,वय 38 वर्ष, पद-मोटार वाहन निरीक्षक व विजय मगणं माऊची, वय 40वर्ष, खाजगी व्यक्ती यांनी तक्रारदार यांच्याकडुन रुपये. ५००/- लाचेची रक्कम मागणी केल्याने, सापळा पथक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या जाळ्यात.


तक्रारदार हे ट्रक चालक असून त्यांना गुजरात मधून महाराष्ट्र राज्याचे हद्दीत ट्रक सह प्रवेश करण्यासाठी खाजगी इसम यांनी कागदपत्रे ok असताना देखील तक्रादार यांच्याकडे 500₹ ची मागणी करून तिचा स्वीकार केला व आलोसे क्र.2 यांनी खाजगी इसमास लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून  त्याचे विरुद्ध  नवापूर पो. स्टे, जि, नंदुरबार येथे गुन्हा दाखल करणयांचे कामकाज सुरु आहे. 


सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री.नारायण न्याहाळदे, पोलीस उप अधिक्षक, मा.श्री. नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांनी केली आहे. त्यांना सदर कारवाई कामी पोअं. प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे, यांनी मदत केली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ 1064 क्रमांक वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

|