Header Ads Widget


व्हाइस ऑफ मिडियाच्या वतीने शिवजयंती महोत्सव निमित्ताने अल्पोहार वाटप!!

   
               
प्रतिनीधी/बिलाल कुरेशी

     कळंब शहरात दिनांक १९/२/२०२३ रोजी छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने व्हाइस ऑफ मिडिया कळंब यांच्या मार्फत शिवभक्तांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.         सविस्तर वृत्त असे की शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी चौकात व्हाइस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने अल्पोहार वाटप करण्यात आले या स्टाॅलचे उध्दघाटन उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मा.यशवंत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक मा.अतुल पाटील,कृषि उत्पन्न सभापती मा.वाघ, व्हाइस ऑफ मिडियाचे शिक्षण आरोग्य विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चेतनजी कात्रे, व्हाइस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमरजी चोंदे,कळंब तालुका पत्रकार संघाचे विस्वस्त सतीश बप्पा टोणगे,दै आपले लोकवृत्त मुख्य कार्यकारी संपादक राहुलजी हौसलमल ,  रनजीत गवळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करुन स्टाॅलचे उध्दघाटन करुन वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते वडापावाचे वाटप करण्यात करण्यात आले यावेळी चेतनजी कात्रे यांनी दिवसभर थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी व्हाइस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरजी चोंदे, परमेश्वर पालकर सर,दिपक माळी, शिवप्रसाद बियाणी, तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे,उपअध्यक्ष श्रीकांतजी मडके, रामराजे जगताप, सलमान मुल्ला, रनजीत गवळी व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले तसेच स्टाॅल समोरील व बाजूला पडलेला कचरा उचलण्याचे काम शिवप्रसाद बियाणी,घुले, रामराजे जगताप यांनी केले व व्हाइस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी यांनी शहरातील सर्व अल्पोहार स्टाॅलला भेटी देऊन स्टाॅल प्रमुख यांचे व्हाइस ऑफ मिडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच कायम व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आपले कर्तव्य बजावत असतात त्या ठिकाणी जाऊन अल्पोहाराचे वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबीरास भेट देऊन व्हाइस ऑफ मिडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमरजी चोंदे यांनी रक्तदान केले यावेळी सुमीत बलदोटा,यश सुराना,ज्योतीताई सपाटे, बाळासाहेब जाधवर,ॲड.मनोजकुमार थोरात,रसुल तांबोळी, संतोष पाटील, आडसुळ व व्हाइस ऑफ मिडियाचे सर्व पदाधिकारी आणी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|