Header Ads Widget


थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली...

प्रतिनीधी/ बिलाल कुरेशी 
कळंब:- : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. याप्रसंगी डी जी ग्रुपचे अध्यक्ष राहुल हौसलमल यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संत गाडगेबाबांनी विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली. साक्षरतेचा प्रचार-प्रसार केला. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे ते थोर संत होते, असे प्रतिपादन लेजंड ग्रुपचे अध्यक्ष महानगरसेवक अमर गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डीजी ग्रुपचे तालुकाध्यक्ष  सिद्धार्थ तात्या वाघमारे, प्रजनिशीत हौसलमल महेश राऊत निलेश नाईकवाडे आदेश गायकवाड  शंकर होनराव योगेश राऊत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Sunday, April 13. | 8:50:53 PM