Header Ads Widget


सानेगुरुजी मित्र मंडळ तर्फे गाडगेबाबा जयंती साजरा.



शहादा बुलेटिन- तालुक्यातील अवगे येथील जिल्हापरिषद  मराठी शाळेत खरे देव हे आपले आईवडीलच  असतात असा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरा करण्यात आली.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते गाडगेबाबा यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख पराग चौव्हणं होते तर प्रमुख पाहुणे सानेगुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, शालेय समेतीचे अरमन लक्ष्मीबाई पवार,सचिव गुलाबराव पवार, लोणखेडा जेष्ट नागरिक मंडळाच्या उपाध्यक्षा सुशिला वसंत पाटील जायन्ट्स ग्रुपच्या आशा चौधरी शिला पाटील मुख्याध्यापक गणेश भिलावे आदी उपस्तिथ होते. 
या वेळी शाळेतील गुणवंत विध्यार्थी श्रीनाथ कृष्णा भिल, सिमा सुरेश सोनवणे, उर्मिला अशोक पवार, कार्तिक कृष्णा भिल, ओम ईश्वर पवार यांना मान्यवरांच्या हप्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला व सर्व विध्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल शॉपणार असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
कार्यक्रमात पराग चव्हाण, माणक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांच्या शेवटी माणक चौधरी यांनी विध्यार्थ्यांनां स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गुलाबराव पवार 
 यांनी तर सूत्रसंचालन शामलाल पवार यांनी तर आभार दिपक पवार यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|