विसरवाडी प्रतिनीधी/समीर पठाण
गंगापूर जवळ धावत्या ट्रक ला भिषण आग
नवापुर तालुक्यातील विसरवाडी पासुन तीन कि.मी.अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाच्या शिवारात ,महामार्गावर दुपारी चार वाजता धावता मालट्रक क्रमांक जी.जे 26 यु 9646 हा आंद्रप्रदेश हुन भावनगर येथे लोखंड भरून जात असताना मालट्रक चा टायर गरम झाल्याने अचानक आगेच्या ठिणग्या निघत असल्याने चालकाच्या लक्षात आले चालकाने ट्रक उभी करून बघितले असता आगेने क्षणात रोद्र रुप धारण केले बघता बघता संपूर्ण मालट्रक ला आग लागली दुर दुर पर्यंत आग आणी धुर दिसु लागले ,मालट्रक संपूर्ण जळुन खाक झाला या मालट्रक वरिल चालक व सहचालक घाबरून दुर पळवुन गेल्याने जिवीतहानी टळाली अन्यथा मोठा अनर्थ झाला,आग इतकी भयानक होती की टायर फुटण्याचे आवाज दुर दुर पर्यंत येत असल्याने आजुबाजुचे नागरिक होटल व्यसायिक भयभीत झाले होते असता ,विसरवाडी पोलीस ठाण्यात सदरची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उप.नि.भुषण बैसाणे, पो.कॉ.पिंटु पावरा. अतुल पानपाटील, होमगार्ड दाखल झाले आणी अग्निशमन दला फोन करून पाचरण करण्यात आले होते,मालट्रक ला महामार्गावर आग लागल्याने रस्त्यावर दोघे बाजु वाहतूक ठप्प झाली आहे .
0 Comments