Header Ads Widget


गावठी पिस्तोल, कोयत्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी शिक्रापूर पोलीसांकडून जेरबंद

पुणे ग्रामीण, दि. २३/०२/२०२३.


दिनांक 21/02/2023 रोजी 20:15 वा.चे सुमारास मौजे टाकळीभिमा घोलपवाडी, ता.शिरूर, जि.पुणे. गावचे हद्दीत न्हावरा-तळेगाव रोडलगत असणारे राहुल कर्पे यांचे प्लॉटींग जवळ मोकळया जागेत ०३ इसम हे दरोडा टाकण्यासाठी गावठी पिस्तोल, दोन जिवंत काडतुसासह, धारदार चाकु, मिरची पूड, रस्सी, बॅटरी व लोखंडी कोयता असे हत्यारे व साहित्य सोबत घेवुन दरोडयाची पुर्व तयारी करून एकत्र येऊन रोडने जाणारे इसमांवर व वाहनांवर दरोडा टाकण्याच्या इरादयाने स्वतःजवळ हत्यार बाळगले स्थितीत पोलीसांचे सतर्कतेमुळे मिळून आले आहेत. तसेच त्यांचेकडून गावठी पिस्तोल, दोन जिवंत काडतुसासह, धारदार चाकु, मिरचीपूड, रस्सी, बॅटरी व लोखंडी कोयता असे हत्यारे जप्त केलेली आहेत.

सदर गुन्हयातील आरोपी याचेवर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप्प यासारख्या सोशल मिडीयाचा प्रभाव असुन तो अन्य एका गुन्हेगाराचा चाहता असुन तो त्याचे अनुकरण करत असल्याचे रिल्स बनवुन तो सोशल मिडीयावर टाकत असतो. त्याने यापुर्वी खुन, जबरी चोरी, आर्म ऍक्ट या सारखे गंभीर गुन्हे विधी संघर्षित असताना केले आहेत. त्याचेवर शिरूर तालुक्यातील पोलीस ठाणे येथे ०६ गुन्हे दाखल आहेत.

सोशल मिडीयावर लक्ष ठेवुन दहशत किंवा प्रसिद्धीसाठी रिल्स बनवुन दहशत माजविणाऱ्या व्यक्तींवर निगराणी ठेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत श्री.अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी आदेश दिलेले आहेत.

त्या अनुशंगाने सोशल मिडीयावर कोणी वरील प्रमाणे हत्यारे, कोयते, पिस्तोल किंवा दहशत करण्याच्या हेतुने कोणी रिल्स/स्टेटस बनविले असल्यास शिक्रापूर पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी असे आव्हान पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद क्षिरसागर यांनी केलेले आहे.

सदरची कामगिरी ही श्री.अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, शिक्रापुर पोलीस स्टेशन, सहा.पोलीस निरीक्षक, नितीन अतकरे, सहा.फौज/पानसरे, पो.हवा/होळकर, पो.हवा/होनमाने, पो.हवा/दांडगे, पो.ना/पाटील, पो.ना/चितारे, पो.कॉ/रावडे, पो.कॉ/देवकर, पो.कॉ/शिवनकर, पो.कॉ/शिरसकर यांनी केलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि.नितीन अतकरे व पोलीस नाईक रोहीदास पारखे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|