Header Ads Widget


नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली गडचिरोली पोलीस दलाने केल्या हस्तगत

 गडचिरोली, दि. २३/०२/२०२३.


नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली जप्त केल्या.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक 21/02/2023 रोजीचे सकाळी 10:00 वा. चे सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी हद्दीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या 02 रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत 01 सिंगल बॅरल 12 बोअर रायफल व 01 एसएसआर रायफलचा समावेश आहे.

सदर अभियान पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि. धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि. श्री. कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Post a Comment

0 Comments

|