नंदुरबार शहरातील डीआर हायस्कूलच्या परिसरात बोर्डाचे पेपर सुरू असताना कॉपी पुरवठा करणाऱ्या दोघे युवकांवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या बाबतची माहिती आज पोलिसांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार रोहित राजेंद्र बोरसे रा. शनिमंडळ व स्वामी छोटू चौधरी राहणार चौधरी गल्ली नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेला दोघं युवकांचे नाव आहे.
नंदुरबार शहरातील डीआर हाय स्कूल परीक्षा केंद्राच्या आवारात दोघी युवक परीक्षकांना कॉपी पुरवठा करीत असताना सापडले नंदुरबारचे जिल्हा अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी रोहित बोरसे व स्वामी चौधरी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments