Header Ads Widget


संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात 'श्रीरामपूर ग्रामपंचायत' ही विभागीयस्तरावरून द्वितीय क्रमांकाचे आठ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र जाहीर...

   

नंदुरबार बुलेटिन -संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  श्रीरामपूर ता. नंदुरबार  या ग्रामपंचायतीस विभागस्तरीय द्वितीय  क्रमांकाचे बक्षीस जाहीर  झाले आहे .
        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2020-21 व 2021-22 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत  व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या   ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी  केली होती . या तपासणीत जिल्ह्यात प्रथम आलेल्या बामखेडा त. त. ता. शहादा व द्वितीय आलेल्या श्रीरामपूर ता. नंदुरबार  या ग्रामपंचायतीची  विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरीता निवड झाली होती .विभागस्तरावरील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिकचे  उपायुक्त (विकास)  मनोजकुमार चौधर यांच्या अध्यक्षतेखालील त्री सदस्यीय  समितीने या ग्रामपंचायतीची तपासणी केली होती . या समितीत विस्तार अधिकारी अनिल राणे , दीपक मोरे यांचा समावेश होता. यावेळी समितीने  शाळा , अंगणवाडी , सखी प्रेरणा भवन , हॅण्ड वाश स्टेशन , फुलपाखरू गार्डन , पिण्याचे पाण्याचे स्त्रोत , गोबर गॅस  घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन , स्माशनभूमी  आदी कामांची पाहणी केली होती .
         तपासणी समितीने प्रदान केलेल्या  गुणांच्या आधारे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच विभागस्तरीय निकाल जाहीर केला असून यात  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत श्रीरामपूर ता. जि . नंदुरबार या ग्रामपंचायतीस दुसऱ्या  क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले आहे . स्पर्धेत बोराडी ता. शिरपूर जि. धुळे यांना प्रथम तर गनेगाव ता . राहुरी  जि . अहमदनगर यांना तृतीय क्रमांक दिला आहे . श्रीरामपूर ग्रामपंचायतीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत  अंतर्गत  विभागस्तरावरून आठ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
     ग्रामपंचायतीस मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत  उपाध्यक्ष सुहास  नाईक , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , सर्व सन्मा . सभापती , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , प्रकल्प संचालक ( जि . ग्रा . वि . अ.) राजेंद्र पी पाटील , जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयवंत उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील , नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले यांनी सरपंच यशवंत गांगुर्डे,उपसरपंच नीलेश अहिरे , पत्रकार सईद कुरेशी,  ग्रामसेविका रूपाली देवरे ,माजी सरपंच शत्रुघ्न गांगुर्डे  ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच फिनीश सोसायटी , डी. सी. एस . व बायफ या सामाजिक संस्थांनी  दिलेल्या योगदानाचे  कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments

|