नंदुरबार-येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनतर्फे रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ वी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे व्यासपीठ उभारुन स्वतंत्र मूर्ती ठेवून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, निशाद पार्टीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रताप सोनवणे, मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी, शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष मुकेश राजपूत, उपाध्यक्ष शंकरराव जाधव, सचिव नासीर बागवान आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुर्ष्पापण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी एजाज बागवान म्हणाले की, फाऊंडेशनर्फे नाट्य मंदिर येथील पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमप्रसंगी तात्पुरत्या स्वरुपाची सीडी उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. मुख्याधिकार्यांनी त्यास सकारात्मकता दाखविली होती. परंतू अद्यापपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत आहे. इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन एक सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्था आहे. संस्थेमार्फत वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यात गरीबांसाठी सामुहिक विवाह, अन्नदान, रक्तदान, पाणपोई, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी अनेक विविध कार्यक्रम राबविले जातात. सूत्रसंचालन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष ऍड.मजहरोद्दीन शेख यांनी केले. तर आभार फाऊंडेशनचे सचिव दानिश बागवान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे सदस्य साहेबराव गावीत, सैय्यद मुख्तार अहमद, कोषाध्यक्ष जमील खाटीक, हाजी सलीम शेख, तौफीक पठाण, व्ही.पी.शेवाळे, हेमंत खेळकर, माजी सरपंच लालचंद पवार आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments