प्रतिनीधी/समीर पठाण
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील याहामोगी धामणदरी देवमोगरा मातेच्या मंदिरात आदिवासी परंपरा रूढी नुसार महाशिवरात्रीनिमित्त तीन दिवसीय भव्य यात्रा पार पडली आहे. परंपरेनुसार चांगला पाऊस देऊन शेती पीकात चांगले उत्पादन यावे, मानवी जीवनाला चांगले आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी प्रार्थनापूर्वक देवीकडे महाशिवरात्रीनिमित्त शेतातून निघालेल्या प्रत्येक धान्याचा काही भाग देवीला अर्पण करण्यासाठी एका टोपलीमध्ये (सिबलीमध्ये) सजवून डोक्यावर ठेवून साडेसात हजार फूट उंच डोंगरावर असलेल्या याहामोगि मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
आदिवासीची कुलदेवता देवमोगरा माता म्हणून ओळख असलेल्या या धामणदरी मंदिरात पुजारी जामसिंग बाबा गावित यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या १८ वर्षापासून महाशिवरात्री निमित्त तीन दिवस या ठिकाणी भव्य यात्रा भरत असते. वर्षानुवर्षे भाविकांची संख्याही वाढत जात आहे. डोंगरमाथ्यावरून खडतर प्रवास करून तीन हजार फूट उंच पायऱ्या चढून देव मोगरा मातेच दर्शन घेत यात्रेचा आनंद घेतला. विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपसाहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण बैसाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या भाविकांसाठी विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांद्वारे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांना येण्यासाठी रस्ता तसेच यात्रेच्या ठिकाणी पाण्याची व विसावा घेण्याची सोय करण्यात आली आहे.
यात्रा महोत्सवात देवीचे दर्शन घेत सर्व भक्तांनी सहकार्य केल्याबद्दल विसरवाडी पोलीस प्रशासन कर्मचारी व स्वयंसेवकांचे पुजारी बाबा जामसिंग यांनी आभार मानले आहे. काशीराम गावित, सिंगा गावित, सुभाष गावित, कुवरसिंग गावित. शिरीष गावित, रविदास गावित आदींनी यात्रेच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत भाविकांना मदत केली. तसेच स्वयंसेवक म्हणून फिलिप गावित, संतोष गावित, राजू गावित, सुदाम गावित, स्वप्निल गावित, निलेश गावित, कमलेश, राहूल, गणेश, दिनेश, दसऱ्या, राहुल गावित, पिंटू वसावे, कैलास कोकणी, विकास कोकणी, प्रकाश कोकणी, देविदास गावित, राजू वसावे, शैलेश पाडवी. आदी सहकार्यानी स्वयंसेवकांची भूमिका निभावत भक्तांना यात्रा महोत्सवात दर्शनासाठी मदत केली.
0 Comments