Header Ads Widget


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे - योगेश्वर बुवा यांचे प्रतिपादन


अक्कलकुवा प्रतिनिधी - अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या शैक्षणिक संस्थेत बज्मे वस्तानवी मराठी यांच्या कडून मराठी भाषा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख अतिथी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी असे प्रतिपादन केले की, मराठी भाषेला खुप प्राचीन इतिहास आहे.मराठी भाषेतूनच वेगवेगळ्या प्रांतात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात.मात्र अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नसल्याची खंत वाटते.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.  


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामिया विश्वव्यापी संस्थेचे संस्थापक हज़रत मौलाना गुलाम मुहम्मद वस्तान्वी, संस्थेचे मार्गदर्शक मौलाना हुजैफ़ा वस्तान्वी होते. कार्यक्रमात  मराठी भाषेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर फारच सुंदर वक्तव्य केले आणि मराठी भाषेचा अभिमान असल्याचं आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी मुहम्मद नदीम अमरावती,आमिर परभणी, नौशाद अकोला, अब्दुल मुईज़, सोहेल औरंगाबाद, आरिफ वैजापूर यांनी मनोगत व्यक्त केले.  या विद्यार्थ्यांना  बक्षीस वितरणासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जामिया इस्लामिया इशातुल उलूम अक्कलकुवा या संस्थेच्या सर्व शाळा , महाविद्यालयचे  प्राचार्य, जामिया मदरश्याचे शिक्षक , राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा , मौलाना जावेद ,  डी.एड कॉलेजचे प्राचार्य साजिद पिंजारी,अलि अलाना इंग्लिश शाळेचे प्राचार्य मुश्ताक सर , ज़फर सर, अब्दुल वाहीद सर,  मुफ्ती जाफ़र , मौलाना कारी सैय्यिद आरिफ़ ,कारी निसार , मौलाना अब्दुर्रहमान मिल्ली , मौलाना यूनुस,अख्लाक सर , अकबर सर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य जावेद सर,डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य तारिक सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना मुजीब इशाती यांच्या मार्गदर्शनाखाली जामिया या विद्यालयातील विद्यार्थी खलील आणि साहिल यांनी केले. 

चौकट - भाषा हे आपले मनोगत, भावना, विचार प्रकट करण्याचे साधन आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा असते. मराठी भाषा ही नवव्या शतकापासून प्रचलित असल्याचे मानले जाते. मात्र अद्याप पर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नसल्याची खंत देखील वाटते.म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

Post a Comment

0 Comments

|