Header Ads Widget


नंदुरबार येथे बोगस आदिवासींना विरोधात विराट जणआक्रोश महामोर्चा !


नंदुरबार प्रतिनिधी : आज १० फेब्रुवारी २०२३ रोजी नंदुरबार येथे विविध आदिवासी  संघटनांच्यावतीने एहतेहासिक जणआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी व महाराष्ट्रात अनेक बोगस व खोटे आदिवासी जवळपास १२ हजार ५०० सरकारी सेवेत कार्यात आहे. 


हे लोक शासनाची फसवणूक करून व भ्रष्ट अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन खोटे जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र बनवून सेवा घेत आहे या खोटे व बोगस आदिवासींना सेवेतून काढून खाऱ्या आदिवासींना सेवेत समाविष्ट करावे अशी मागणी व घोषणा करून नंदुरबार येथे हा विराट मोर्चा काढण्यात आला तसेच या मोरच्यात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व शिंदे फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 


शासनाची दिशाभूल करणारे व फसवणूक करणारे बोगस आदिवासींना तात्काळ सेवेतून काढले पाहिजे.. मात्र शिंदे - फडणवीस सरकार तंस न करता त्या बोगस आदिवासींना संरक्षण देण्याचे काम करत आहे. 


त्यांना संरक्षणासाठी केबिनेटमध्ये संरक्षणा कायदा देखील आणला गेला आहे. या कायदा आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी देखील विरोध केला नाही. 


त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा. हा कायदा आदिवासींच्या विरुद्धच्या आहे. सरकारी नोकरीत सेवा घेण्यास बोगस लोकांना तात्काळ काढून खरे आदिवासींना समाविष्ट करून घ्यावे तसेच विविध प्रश्नांवर एक प्रश्न असे की धनगर समाजाला आदिवासी समाजात प्रवर्गात समावेश करूनये अशी मांगणी या मोरच्यात आदिवासी नेते मंडळी व आदिवासी समाज बांधवांकढून करण्यात आली. 


या सरकारने सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घेतले नाही तर या पेक्षाही मोठा मोर्चा येत्या काळात काढणार असा इशारा सुद्धा देण्यात आला. 


या मोर्चासाठी आमदार विनोद निकोले, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमश्या दादा वळवी, जे.पी गावित, सीमा वळवी, रजनी वाळवी, भरत वळवी, दिलीप नाईक, सदानंद गावित, अरविंद वळवी, मालती ताई, नामदेव पटले, व विविध संघटनांचे अध्यक्ष व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|