Header Ads Widget


शेवाळी (दा.) येथे सुकन्या समृद्धी योजने चे शिबीर संपन्न....

   
 प्रतिनिधि/अकिल शहा    

ग्रामपंचायत शेवाळी (दा.) व पोस्ट विभाग साक्री यांच्या वतीने शेवाळी गावात सुकन्या समृध्दी योजनेचे शिबीर आयोजित करण्यात आले होते यात सुकन्या समृध्दी योजनेचे माहिती व फायदे पोस्टाच्या अधिकार्यानी सांगितले 1ते 10 वर्ष वयोगटातील मुलींची सुकन्या योजनेत खाती उघडण्यात आली या प्रसंगी साक्री पोस्ट ऑफीस चे अधिकारी श्री अमोल साळुंके,श्री नितीन अहिरे,बंडू  कोळेकर, शेवाळी गावच्या सरपंच चित्रा प्रदिप नांद्रे ,उपसरपंच अरुण नेरकर, ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष साहेबराव लक्ष्मण साळुंके, सचिव सुरेशदादा साळुंके,माजी अध्यक्ष अरुणदादा साळुंके, अशोकतात्या साळुंके, उखाजी साळुंके, शेवाळी च्या पोस्टमन पद्मा नांद्रे व मुलींचे पालक उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत चे गटनेते प्रदिप नांद्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शिक्षिका प्रतिभा साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज साळुंके यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|