Header Ads Widget


समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगे बाबा - प्रा. भाऊसाहेब खिचडे संत गाडगेबाबा यांची जयंती...


प्रतिनीध उस्मानाबाद / बिलाल कुरेशी
शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण येथे उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. घोलप के जी व प्रमुख पाहुणे प्रा.भाऊसाहेब खिचडे, प्रा. शेख युसुफ व प्रा. कैलास ओव्हाळ हे होते. स्वच्छता, मानवता आणि शिक्षणाचे महत्त्व यांचा संदेश पसरवत गाडगे बाबा गावोगाव फिरले. रंजल्या गांजल्या लोकांची सेवा केली व समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगेबाबा एक समाजसेवक व क्रांतिकार होते असे  मत प्रा. भाऊसाहेब खिचडे यांनी मांडले. प्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांचा वीर बलिदान दिन साजरा करण्यात आला. एक मिनिटाचे मौन बाळगून हुतात्मा वेदप्रकाश आर्य यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.तांबोळी एफ ए  व आभार डॉ. सय्यद अमर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|