Header Ads Widget


राज्यस्तरीय तायकाँदो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्काराने गौरव उस्मानाबादच्या तायक्वांदो पट्टूंची ११ पदकाची कमाई विजयी खेळाडूसह प्रशिक्षकांचा सन्मान...


 
प्रतिनीधी उस्मानाबाद / बिलाल कुरेशी

उस्मानाबाद: प्रतिनिधी - जिल्ह्यातील तायकांडो खेळाडूंनी राज्यस्तरीय   स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी करीत 11 पदकाची कमाई केली.  उस्मानाबाद येथील  निशा चव्हाण हिने सुवर्ण , माधव महाजन रौप्य तर सुमेध चिलवंत याने रौप्य पदक पटकावले.  एकूण ११ पदकांची कमाई केली. विजेत्या खेळाडू व प्रशिक्षकांचा जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला*. 
*वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो  स्पर्धेत उस्मानाबाद येथील  निशा चव्हाण हिने सुवर्ण पदक पटकावले. ती २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय  पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने  जळगाव येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत १९ वर्ष वयोगटातून ६८-७३ किलो वजनी गटात श्री व्यंकटेश ज्युनिअर कॉलेज घाटंग्री येथील विद्यार्थी माधव महाजन याने रौप्य तर अनुष्का वाघमारे- कांस्य,  अनुश्री राठोड- कांस्य, अभिजित वारे - कांस्य (अभिनव इंग्लिश स्कूल), दिग्विजय पडवळ - कांस्य (श्रीपतराव भोसले हायस्कूल), निशा चव्हाण-कांस्य (भाई उद्धवराव पाटील प्रशाला) व  आर्या बोंदर (ग्रीनलॅन्ड स्कूल) हिने कांस्य पदक पटकावले. राज्यस्तरीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेत सुमेध चिलवंत याने रौप्य पदकाची कमाई केली. ज्युनिअर राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्वेता सावंत हिने कांस्य पदक पटकावले. या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक राजेश महाजन, राम दराडे, आकाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेते खेळाडू व प्रशिक्षक यांचा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री. रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्री.रणदिवे, उपाध्यक्ष जी.बी. कासराळे, पदाधिकारी सूर्यकांत वाघमारे, अनिल बळवंत, रवींद्र जाधव, किरण वैद्य यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

|