प्रतिनीधी/ अकिल शहा
साक्री :आशिया खंडातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हा साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे आहे.सुमारे 500 ते 700 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. या जमिनीचे शासकीय मूल्यांकन कोट्यावधी रुपये आहे.परंतु शासनाने या महत्वकांक्षी योजना राबवण्यासाठी राज्य शासनाकडून व जिल्हाधिकारी यांच्याकडून होईल तेवढी मदत देण्याचे प्रयत्न केले.
आणि त्यातून हा भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प म्हणून कार्यान्वित झाला या प्रकल्पाचे काम चालू असताना जिल्ह्याभरातून या प्रकल्पाला कोणीही विरोध न करता वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यात कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले.साक्री तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हा प्रकल्प आपल्याच तालुक्यात हा प्रकल्प व्हावा यासाठी वरिष्ठ मंत्रालयीन स्तरावर अनेक प्रयत्न करण्यात आलेत आणि हा प्रकल्प चालू करण्यात आला मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवाजीनगर येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा तालुक्यातील वादळी चर्चेचा विषय बनला आहे याचे मुख्य कारण म्हणजे हा प्रकल्प जिथे वसलेला आहे त्या शिवाजीनगर भागात बहुसंख्य शेतकरी हे आदिवासी,धनगर ठेलारी समाजाचे आहेत, स्वातंत्र काळापासून ही जमीन मेंढपाळ चराईसाठी शासनाने तेथील स्थानिक शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती.परंतु कालांतराने तेथे भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प येणार म्हणून शासनाने त्यांना कसण्यासाठी दिलेली जमीन ही शासनाने पुन्हा अधिग्रहण करून घेतली आणि येणाऱ्या प्रकल्पासाठी ती जमीन उपलब्ध करून दिली तरीही तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला सुरू होत असताना कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही.मात्र शासनाच्या नियमानुसार 80% नोकऱ्या ह्या तेथील भूमिपुत्रांना देण्याचा सरकारचा आदेश आहे असे असून देखील प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने शासनाची दिशाभूल करत भूमिपुत्रांना नोकऱ्या न देता परराज्यातून माणसे आणून त्यांना नोकऱ्या दिल्या याचे कारण कमी पैशात बाहेरच्या मजूर काम करू शकतात म्हणून स्थानिकांच विचार न करता पर राज्यातून माणसे आयात करण्यात आली या विषयावर स्थानिक शेतकऱ्यांनी भूमिपुत्रांनी,विविध पक्षांनी, संघटनांनी,अनेक वेळा आंदोलने करून देखील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी न जुमानता आपले स्थानिकाना छळण्याचे काम सतत सुरू ठेवले व निवेदनांची आंदोलनाची कुठलीही दखल न घेता आपले चुकीचे काम सर्रासपणे चालू ठेवले.शेवटी शिवाजी नगरचा वैतागलेल्या शेतकऱ्यांनी व भूमीपुत्रांनी या विषयावर साक्री तालुका तहसील कार्यालयात मा. तहसीलदार चव्हाणके साहेब, साक्री तालुक्याच्या आमदार सौ.मंजुळाताई गावित यांची भेट घेऊन शिवाजीनगर चे काही शेतकरी भूमिपुत्र तसेच विविध संघटना राजकीय पक्ष यांच्यामार्फत तहसील कार्यालयात एक मीटिंग चे आयोजन करण्यात आले या विषयावर सविस्तर चर्चा करून स्थानिकांना नोकरी मिळावी यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशा सूचना आमदार महोदया व तहसीलदार साहेब यांनी कंपनीच्या अधिकारी काकुस्ते साहेब व देसले साहेब यांना दिल्या अन्यथा विधानसभेत तारांकित प्रश्नांमध्ये हा मुद्दा आपण घेऊ असेही आमदार महोदय म्हटल्या तसेच येणाऱ्या दोन दिवसात आपला खुलासा स्पष्ट करावा असे आदेश तहसीलदार व आमदारांनी सौर ऊर्जा कंपनीला व त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले.
0 Comments