प्रतिनिधी/सईद कुरेशी सह. संपादक
नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर नंदुरबार रेल्वे पोलिसांनी दाखवली माणुसकी हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशास तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देऊन दिले मोठे जीवदान. दि.31 जानेवारी रोजी दुपारी सुरतकडे जाणारी नवजीवन एक्सप्रेस रेल्वे (क्र.12655) मधुन प्रवास करणार्या एका प्रवाशास नंदुरबार जवळ येताच अचानक त्यास हृदयविकाराचा झटका आला, गाडी नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचताच, नंदूरबार रेल्वे पोलीसांनी तत्परता दाखविली व तात्काळ धाव घेत पालिकेच्या रुग्णवाहिकेला बोलावून रुग्णाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने व वेळीच योग्य उपचार मिळाल्याने सदर प्रवासी रुग्णाचा जीव वाचला,
नंदुरबार रेल्वे पोलीसांनी अत्यंत तत्परता दाखवत माणूसकीचे दर्शन घडविल्याने त्यांच्या कर्तव्य दक्षतेवर जनसामाण्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.याबाबत सविस्तर प्राप्त माहितीनुसार आज दि. 31 जानेवारी रोजी दुपारी नवजीवन सुपरफास्ट रेल्वे (क्र.12655) यातील सर्वसामान्य प्रवसी डब्यातून श्रीनिवास नरसिया कस्तुरी(वय 48,रा.उधना,सुरत) हे आपली पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांच्यासोबत वारंगल ते सुरत असा प्रवास करत असतांना नंदुरबार रेल्वेस्थानक जवळ येताच अचानक श्रीनिवास कस्तूरी यांच्या छातीत कळा येवू लागल्या, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली, याबाबत नंदुरबारचे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलीसांना कळविताच गाडी येण्याआधी रेल्वे पोलीसांनी प्लॅटफार्मवर धाव घेत, रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले, यावेळी रेल्वे पोलीस हवालदार प्रकाश गोसावी, रवी पाटील व पोलीस नाईक विशाल कातीलकर यांनी श्रीनिवास कस्तूरी यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व वेळीच रुग्णालयात नेल्याने योग्य उपचार मिळाल्याने कस्तुरी यांचा जीव वाचला, यामुळे श्रीनिवास यांच्या पत्नी तेजस्वीनी व मुलगी लक्ष्मी यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केलेत, दरम्यान, रेल्वे पोलीसांनी आपले कर्तव्य बजावत जे माणूसकीचे दर्शन घडविले, त्यांच्या या कृतीचे जनसामण्यातुन कौतुक करण्यात येत आहे.
0 Comments