Header Ads Widget


बिग ब्रेकिंग महाराष्ट्र- गुजरात राज्य सीमेवर चार पैकी एक बिबट्या जेरबंद व दुसऱ्या बिबट्यांसाठी आज पुन्हा पिंजरा लावण्यात आला...

Spessiol Report : सईद कुरेशी ( लाईव्ह नेशन न्यूज सह.संपादक)

नंदुरबार/ प्रतिनिधी : महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील अक्कलकुवा तालुक्यातील गुळीआंबर, चाटूवाढ, खापर, ब्राह्मणगाव या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चार बिबट्यांच्या वावर असल्याचे लोकांकडून मेवाती वन विभाग अक्कलकुवा यांना सांगितले असता, गेल्या आठवड्यात खापर येथील गौशाळेच्या दोन गाईंना या बिबट्याने फडशा पाडून ठार केले आहेत. खापर आणि ब्राह्मणगाव दरम्यान असलेल्या गौशाळेवर सर्वात आधी या बिबट्याने हमला केला होता .या गावांमधील नागरिकांनी महाराष्ट्र शासनातील अक्कलकुवा तालुक्यातील मेवासी वन विभागाला निवेदन देऊन सदर बिबट्यांना जेरबंद करावे.

अशी मागणी तेथील अधिकारी श्री.ललित गवळी यांच्याकडे करण्यात आली होती ,परंतु अद्यापही बाकी बिबट्यांना जेरबंद करण्याचे वन विभागापुढे मोठे आश्वासन उभे राहिले ,असून बिबट्याना जेर बंद करण्यात अतीमहत्त्वाचे झाले होते पुन्हा या परिसरात त्यांच्या वावर असलेल्या परिसरात पिंजरा लावण्यात आला. याच बिबट्यांद्वारे गुजरात राज्यातील अनेक गावांमध्ये देखील मानवहानी व पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झालेला आहे. यावर आळा बसावा म्हणून अखेर वन विभागाच्या पथकाने पिंजरा लावून संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान बाकी राहिलेल्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तैनात केले आहे. 


महाराष्ट्र वन विभागाच्या पथकांनी देखील घटनास्थळी दाखल होत कार्यवाही व ग्रामस्थांकडून सहकार्यासहित पिंजरा मांडण्यात आला. या परिसरात एकूण चार बिबट्यांच्या वावर असून त्यापैकी एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असले ,तरी आणखी तीन बिबट्याचां या परिसरात मोकाट फिरत असून वन विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरिक शेतातील कामे करण्यासाठी देखील धजावत आहेत.


शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले होते, शेतकरी व परिसरातील नागरिकांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे वन विभागाने सदर बिबट्यांना जेरबंद करून नागरिकांना वन्य प्राण्यांपासून असलेला धोका टाळण्यासाठी आर एफ ओ खापर ललित गवळी साहेब यांनी योग्य मार्गदर्शन शेतकरी व शेतमजूर एकटे एकट्या व्यक्तीने फिरू नये, रात्रीच्या वेळेस दोन-तीन व्यक्ती सोबत जावे, बिबट्या दिसल्यास तात्काळ 19 26 या नंबर वर कॉन्टॅक्ट करावे. असे अनेक प्राथमिक खबरदारी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले


यावेळी आर एफ ओ खापर ललित गवळी, वनपाल एस के तेले, एस ए पाटील, वनरक्षक आर जी पवार, डी एस नागमल, एस आर बैरागी ,देशमुख, डी आर पटले वन मजूर कोट्या वसावे व वाहन चालक नितीन राठोड असे सर्व वन विभाग पूर्ण पथक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी बिबट्यांच्या हौदास कमी व्हावा. अशी मागणी या परिसरातील गावकऱ्यांनी निवासी वन विभाग अक्कलकुवा यांच्याकडे केले असता पुढील कार्यवाहीसाठी दुसरा पिंजरा घेऊन गौशाळेच्या परिसरात योग्य त्या जागेवर दुसरा पिंजरा बिबट्यांसाठी तैनात करण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments

|