Header Ads Widget


Paternity Leave : वडील झाल्यावर कंपनी देणार 12 आठवड्यांची सुट्टी, फायझरच्या कंपनीचा कौतुकास्पद निर्णय

Pfizer Paternity Leave : फायझर कंपनीने 1 जानेवारी 2023 पासून हे नवीन धोरण अंमलात आणले आहे. कर्मचाऱ्यांना चार टप्प्यामध्ये ही सुट्टी घेता येईल.

Pharma Firm Pfizer Paternity Leave : फार्मा कंपनी फायझर इंडियाने (Pfizer India) मोठा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. वडील झाल्यावर कर्मचाऱ्यांना 12 आठवड्यांची सुट्टी (Paternity Leave) देण्याचा मोठा निर्णय फायझर कंपनीने घेतला आहे. कंपनीने 1 जानेवारी 2023 पासून हे नवीन धोरण अंमलात आणले आहे. कर्मचाऱ्यांना चार टप्प्यामध्ये ही पॅटर्निटी लिव्ह (12 Week Paternity Leave) घेता येणार आहे. तसेच बायोलॉजिक तसेच दत्तक बाळांच्या वडीलांनाही ही 12 आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे. फायझर कंपनीने गुरुवारी याबाबत अधिकृत धोरण जाहीर केले आहे. 

Post a Comment

0 Comments

|