Punjab : पंजाबच्या पटियाला येथील कुकू राम आणि मुकेश कुमारा या दोन शरीरसौष्ठवपटूंना देशासाठी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकूनही आज टॉयलेट साफ करावे लागत आहे.
कुकू राम व्यतिरिक्त मुकेश शर्मानेही (Bodybuilder Mukesh Sharma) या प्रसिद्ध स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले. या कामगिरीनंतरही त्यांना हे काम करावे लागत आहे. कुकू (53 वर्षे) आणि मुकेश (44 वर्षे) यांना दरमहा 9 हजार रुपये सफाई कामासाठी दिले जातात. भारताच्या या दोन शरीरसौष्ठवपटूंनी थायलंडमध्ये 18 देशांतील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्ण आणि रौप्य पदकांवर कब्जा केला होता. या स्पर्धेत कुकू राम 50+ या वर्गात सहभागी झाला होता. राम सध्या पटियाला महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतो. तो अनेक वर्षांपासून बॉडीबिल्डिंग करत आहे. कुकू रामच्या पत्नीने सांगितले की, 'तो आता साफसफाईचे काम करतो आणि मी घरी कपडे शिवण्याचे काम करते. कुकू 1998 पासून शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत आहे परंतु कमी पैशांमुळे त्याने भाग घेणे थांबवले होते, तरीही 2014 मध्ये तो पुन्हा या खेळांमध्ये परतला आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला.
'देशासाठी पदक जिंकूनही काहीही बदललं नाही'
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत (Viral Video on Social Media) असलेल्या व्हिडिओमध्ये कुकू राम म्हणत आहेत की पदक जिंकूनही काहीही बदलले नाही. कुकू सध्या आपल्या आणि कुटुंबाच्या पोषणासाठी शौचालये साफ करत आहे. तर मुकेश कुमार झाडू काढण्याचे काम करत आहे.
0 Comments