Header Ads Widget


नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ नवापूर हे शासकीय वाहनाने NH 06 ने पेट्रोलिंग करताना संशयित वाहन मुद्देमालासह ताब्यात..

 


नवापूर! Navapur/LivenationNews


 दिनांक 20 /1 /2023 वार शुक्रवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून  वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक व  वनक्षेत्र स्टाफ नवापूर सह शासकीय वाहनाने नवापूर शहरात NH 06 ने पेट्रोलिंग करताना संशयित वाहन क्रमांक MH 19 AP 5555 याचा रेल्वे गेट नवापूर जवळ अटकाव केला असता वाहन चालक गाडी थांबून पसार झाला तरी गाडीची तपासणी केली असता सदर वाहनात शाल मध्ये  साग लाकडापासून तयार केलेली चौकट फेम नग एक दिसली तरी मुद्देमाला सह वाहन जप्त करून    शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून  पावतीने जमा  केले.   जप्त माल सागवान फ्रेम (चौकट) नग 01 व स्कोडा वाहन क्रमांक MH 19 AP 5555 या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 3 ते 3.5 लाख  रूपये एवढी आहे.

सदर कार्यवाहीत  म.स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक, भिवाजी दराडे वनपाल खेकडा, सुनिता पाटील वनपाल वडकळंबी ,वनरक्षक कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, कमलेश वसावे , गिरीश वळवी वाहन चालक दिलीप गुरव यांनी सहभाग घेतला.

सदर कार्यवाही ही  म.हौसिंग साहेब वनसंरक्षक धुळे ,श्री. कृष्णा भवर उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार  व म. धनंजय ग.पवार सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .

म.वनक्षेत्रपाल नवापुर प्रा.नंदुरबार वनविभाग नंदुरबार यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा अशी विनंती...

Post a Comment

0 Comments

|