धडगाव ! Dhadgav /LivenationNews
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील माकडखुंटचा जुनापाटीलपाडा येथील भीमा ठोंबा पाडवी, साकर्या भापा पाडवी, सुभाष केल्ला पाडवी व राशा केल्ला पाडवी सर्व माकडखुंटचा जुनापाटीलपाडा येथील राहणाऱ्यांनी भीमा ठोंबा पाडवी याची पाच वर्षाची मुलगी अमिषा ही शेकोटी करत असताना
जळाली सदर महिलेने अमीशावर जादूटोणा केल्यामुळे ती बरी होत नाही, व सदर महिलाही डाकीण आहे असा संशय घेऊन भीमा पाडवी, साकऱ्या पाडवी, सुभाष पाडवी व राशा पाडवी यांनी सदर महिलेवर डाकीण असल्याचा संशय घेत तिला व तिच्या पतीला हाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने, धडगाव पोलिसात 4/2023 भादवीक 323, 504, 506 34 सह महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम 3 (2) प्रमाणे आरोपिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments