Header Ads Widget


उल्हासनगरात नोकरीचे आमिष दाखवून १५ लाखांची फसवणूक

उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी विश्वकर्मा व सय्यद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर : ऑर्डनस कंपनी मध्ये ज्युनिअर इंजिनिअर यापदावर नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून १५ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात शशिकांत विश्वकर्मा व परविद सय्यद यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणारे विनायक राठोड यांच्या मुलाला अंबरनाथ येथील ऑर्डनस फॅक्टरीत ज्युनिअर इंजिनिअर पदी नोकरीवर लावून देण्याचे आमिष ओळखीचे असलेले शशिकांत विश्वकर्मा व परविद सय्यद यांनी दाखविले. १७ ऑगस्ट २०१९ ते ६ जानेवारी २०२३ दरम्यान दोघांनी संगनमत करून राठोड यांच्याकडून वेळोवेळी आजपर्यंत १५ लाख उखळले. दरम्यान नोकरी लावून देत नाही. हे लक्षात आल्यावर राठोड यांनी पैसे परत करण्याचा तगादा त्याच्याकडे लावला असता, त्यांनी राठोड यांना पैसे न देत नसल्याचे सांगितले. अखेर राठोड यांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी विश्वकर्मा व सय्यद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments

|