Header Ads Widget


साक्री तालुक्यातील निजामपुरात गोदामाचे सेटर कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनच्या ७० गोण्या केल्या लंपास

साक्री ! Sakri/LiveNationNews
प्रतिनिधी : अकील शहा

साक्री : साक्री तालुक्यातील निजामपूर येथील रस्त्याच्या लागत असलेल्या राणे नगर जवळील गोदामाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनच्या ५० किलो वजनाच्या ७० गोण्या चोरून नेल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात येथील व्यापारी रुपेश श्रीधर वाणी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार व्यापारी श्रीधर बंडू वाणी यांच्या मालकीचे खुडाणे रस्त्यालगच्या राणे नगर जवळील शेतात पत्र्याचे गोदाम आहे. या गोदामाचे सेंटर कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व सोयाबीनच्या ७० हजार रुपये किमतीच्या ५० किलो वजनाच्या ७० गोण्या बाहेर काढून वाहनात भरून चोरून नेल्या तर गोदामा बाहेर २० गोण्या तशाच सोडून चोरटे पसार झाले सकाळी दूध घेण्यासाठी रुपेश वाणी हे गेले असता त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भांदवी कलम ३८० अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय ईश्वर शिरसाठ करीत आहे

Post a Comment

0 Comments

|