Header Ads Widget


WhatsApp ग्रुपमध्ये दुसऱ्या कॉन्स्टेबलसोबत पत्नीचा व्हिडीओ पाहिला आणि मग...

Mumbai Crime News : मुंबई पोलिसात कार्यरत आरोपी अभिजीत परब नो पॉलिटिकल ग्रुप नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जुळलेला होता. ज्यात अलिकडे अनेक अश्लील व्हिडीओ येत होते.

Mumbai Crime News : महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये एका कॉन्स्टेबलने दुसऱ्या पोलीस सहकाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला. ज्यानंतर त्याला नोकरीहून सस्पेंड करण्यात आलं. अश्लील व्हिडीओ शेअर करणारा स्वत: त्या व्हिडिओत दिसत आहे. त्याच्यासोबत सहकारी पोलिसाची पत्नी आहे. ही घटना समोर आल्यावर सगळेच हैराण झाले. 

मुंबई पोलिसात कार्यरत आरोपी अभिजीत परब नो पॉलिटिकल ग्रुप नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जुळलेला होता. ज्यात अलिकडे अनेक अश्लील व्हिडीओ येत होते. त्या ग्रुपमध्ये इतरही पोलीस कर्मचारी होते. 9 डिसेंबरला परबने त्याच ग्रुपमध्ये त्याचा आणि महिलेचा एक अश्लील व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ इतर पोलीस सहकाऱ्यांनीही पाहिला. 

व्हिडीओ डाऊनलोड झाल्यावर एका पोलीस सहकाऱ्याला धक्का बसला. कारण अश्लील व्हिडीओत कॉन्स्टेबल परबसोबत दिसणारी महिला दुसरी कुणी नसून त्याची पत्नी होती. 

त्यानंतर त्या पोलिसाने आपल्या पत्नीला विचारपूस केली आणि व्हिडीओ शेअर करून बदनामी केल्याबाबत परब विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितलं. पण त्याच्या पत्नीने असं करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने पत्नीच्या नातेवाईकांना बोलवून तिला आपल्या माहेरी सातारा येथे पाठवलं.

मग त्या पोलिसाने 9 डिसेंबरला कॉन्स्टेबल अभिजीत परब, पत्नी आणि त्या मोबाइल नंबर विरोधात गुन्हा दाखल केला. ज्यावरून व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ पाठवण्यात आला होता. त्या ग्रुपमध्ये 126 सदस्य होते. 

पोलिसाने आरोप लावला की, व्हिडीओमुळे त्याची अब्रुनुकसानी झाली. पीडित पोलिसाने परब विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. यानंतर कॉन्स्टेबल परबला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एका नोटीस जारी करून त्याची चौकशी सुरू केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला निलंबित करण्यात आलं. अधिकारी म्हणाले की, चौकशीनंतर आरोपीवर कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments

|