Header Ads Widget


नंदुरबार शहरात एका उर्दू शाळेची मान्यता रद्द करण्याचे शिक्षण संचालक कडून अहवाल सादर

Live Nation News Bulletin : 

ईकरा एज्युकेशन सोसायटी संचलित सैय्यद शेरे अबुल गाजी मिया उर्दू  शाळा नंदुरबार या शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षणधिकारी नंदुरबार, द्वारे शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या शाळेस संबंधीत तक्रार मिळल्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नंदुरबार, यांना अहवाल सादर करणेबाबत निर्देश दिले होते. 
गटशिक्षण अधिकारी यांनी या शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता शाळा बंद असल्याचे आढळून आल्याचे अहवाल सादर केले त्याचप्रमाणे सदर शाळेच्या यु-डाईस क्रमांक रद्द करण्याच्या कारवाईसाठी शिफारस केलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे. 

या संस्थेने प्रशासनास खोटी माहिती सादर करून शासकीय अनुदान लाटण्याच्या तसेच शासनाची फसवणूक करण्याचे प्रयत्न निर्देशनास येत आहे.

Post a Comment

0 Comments

|