Header Ads Widget


बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या द्वारा होणाऱ्या अनियमितता या बाबत जाणून घ्या..

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या द्वारा होणाऱ्या अनियमितता या बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्या आपण कश्या प्रकारे सर्व सामान्यांच्या समोर आणू शकतो याबाबत माहिती घेऊ..


सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कार्यालये जसे की, उपविभागीय अभियंता, उपविभाग आणि जिल्हा परिषद ची कार्यालये उपविभागीय अभियंता उपविभाग यांच्याकडून ग्रामीण भागातील बरीच कामे केली जातात.. त्यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते आणि त्यांची किरकोळ दुरुस्ती वेळोवेळी चालू असते.. यामधे बरेचदा होते असे की त्यांनी विविध रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती केलीच तर फक्त gps फोटो ठेवण्याची तरतूद आहे.. आणि फक्त या फोटोंच्या आधारेच त्यांना त्या देयकाची रक्कम अदा करण्यात येते... आणि वेळोवेळी थोड्या ज्यास्त प्रमाणात रस्त्यांची कामे ही चालूच असतात.. कामांची मोजमाप पुस्तके मागूनही जन माहिती अधिकारी हे लवकर देत नाहीत.. दिली तर ती त्या रस्त्याचा दोष दुरुस्तीचा कालावधी झाल्यानंतर काही प्रमाणात दिली जातात.. एकाच रस्त्यावर परत परत बिले काढलेली आहेत किंवा कसे याबाबत अधिक तपशिल हा आपल्याला कार्यालयाच्या लेखा परीक्षण अहवालात पाहायला मिळेल म्हणून सजग नागरिकांनी लेखा परीक्षण अहवाल पाहून त्या कार्यालयांनी नेमकी कामे केली तरी कितीक आणि त्यापैकी सद्या अस्तित्वात आणि स्तुस्तीतीत आहे तरी कितीक याचा तपशील जरूर पहावा..

Post a Comment

0 Comments

|