Header Ads Widget


माहितीचा अधिकार 2005 : कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती याबद्दल जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो आज आपण कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती याबद्दल जाणून घेणार आहोत आणि कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित माहिती प्रसिद्ध केली नसल्यास सजग नागरिकांनी करावयाचे प्रयत्न याबद्दल जाणून घेवू..

ज्या नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर केलेला नाही किंवा ज्यांना या कायद्याचा वापर आपल्या परिसरातील शासकीय कामात होणाऱ्या अनियमितता गैरकारभार सर्व सामान्य जनते समोर आणण्यासाठी करायचा आहे, त्यांनी या कायद्यातील कलम 4 (1) ख चा अभ्यास करून तो तोंडी पाठ करायला हवा..


एकदा का तुम्ही माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1) ख मधील एक ते सतरा बाबींचा अभ्यास केला. तर समजून जा तुम्हाला 60 ते 70 टक्के कायदा आणि कायद्याचा मूळ हेतू कळाला..


म्हणून माहिती अधिकार वापरात नवीन असलेल्या सर्वांनी यातील कलम 4(1) ख मधील 1 ते 17 बाबींचा अभ्यास करावा..


शक्यतो आपल्याला हवी असलेली माहिती कलम 4(1) ख मधील 1 ते 17 बाबींमध्ये उपलब्ध असते..


आणि सदर माहिती प्रत्येक शासकीय कार्यालयांनी स्वतः प्रसिद्ध करणे अपेक्षित असते, कार्यालयाने सदर माहिती स्वतः प्रसिद्ध केली नसल्यास आपण माहिती अधिकार अर्ज व निवेदन संबंधित कार्यालयात दाखल करून कार्यालयाने स्वतः प्रसिद्ध करावयाची कलम 4(1) ख मधील 1 ते 17 बाबींची माहिती मागवावी किंवा ती कार्यालयात व अगर कार्यालयाचे स्वतंत्र संकेतस्थळ असल्यास त्यावर प्रसिद्ध करण्याबाबत त्यांना विनंती करावी..


आपल्याला कार्यालयाशी संबंधित 1 ते 17 बाबींची माहिती मागवायची असल्यास किंवा निवेदन सादर करावयाचे असल्यास Google Drive वर अर्ज व निवेदन अद्ययावत करण्यात आले आहे.. 


आपण पाहुयात माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 1 ख मधील 1 ते 17 बाबी आहे तरी कोणत्या,

माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1)ख 


(1) आपली रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील;

यामध्ये मंत्रालयीन विभागाचे, विभाग कार्यालयाचे नाव, खाते प्रमुखाचे नाव, विभागाचे धेय धोरण, विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा तपशिल, कामाचे विस्तृत स्वरुप, मालमत्तेचा तपशील, उपलब्ध सेवा, कार्यालयीन दूरध्वनी वी कार्यालयाचा पत्ता व वेळ ही माहिती प्रसिद्ध स्वतः प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे..


(2) आपले अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये; 

यामध्ये कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचे पदनाम, आर्थिक अधिकार/ प्रशासकीय अधिकार/फौजदारी अधिकार किंवा इतर अधिकार यासाठी असलेले कायदा, नियम, विनियम, शासन आदेश, परिपत्रक किंवा इतर माहिती प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे..


(3) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली; 

कामाचे स्वरूप, कामासाठी लागणारा कालावधी, कामासाठी जबाबदार अधिकारी, अभिप्राय व इतर तपशिल प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे..


(4) स्वतःची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्याकडून ठरविण्यात आलेली मानके;


(5) त्याच्याकडे असलेले किंवा त्याच्या नियंत्रणात असलेले किंवा त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्याच्या कर्मचारीवर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख;


(6) त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गांचे विवरण;


(7) आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील;


(8) आपल्या एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळांचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण; आणि त्या मंडळांच्या, परिषदांच्या, समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण; 


(9) आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका;


(10) आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन; तसेच प्राधिरणाच्या विनियमांमध्ये तरतूद केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची पद्धती;


(11) सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल;


(12) अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशील;


(13) ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा


(14) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबंधातील तपशील.

                                            

(15 ) माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशील, तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथालयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील;


(16) जन माहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील; 


(17) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती;


प्रसिद्ध करील आणि त्यानंतर दरवर्षी ती प्रकाशने अद्ययावत करील;


सजग नागरिकांनी माहिती अधिकार कायद्यात अधिक परिपक्व होण्यासाठी अधिनियमातील कलम 4 1 ख मधील 1 ते 17 बाबींचा सखोल अभ्यास करावा..


सतत अद्यावत माहिती अधिकार अर्ज, प्रथम व द्वितीय अपील अर्ज, निवेदन आणि दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत करावयाचे तक्रार अर्जाचे एकूण 170+ अर्ज Google Drive वर मिळवा..

संपर्क : 9763127223 ( WhatsApp Only )

Post a Comment

0 Comments

|