Header Ads Widget


जिल्हादंडाधिकारी व नंदुरबार पोलीस अधीक्षक कडून नागरिकांना सतर्कतेचा विशेष आव्हान

Live Nation News

नंदुरबार प्रतिनिधी ! Nandurbar

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलगट उकाई ( गुजरात राज्य ) गटाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे सन २०२२-२०२३ वार्षिक गोळीबार सराव दिनांक १७/०१/२०२३ ते २०/०१/२०२३ या कालावधीत नंदुरबार शहरातील बिलाडी रोड ईदगा मैदान जवळ नंदुरबार लागत असलेल्या फायरबट येथे घेणेबाबत माननीय जिल्हा दंडाधिकारी नंदुरबार यांच्या कडून परवानगी मिळाली आहे. सदर क्षेत्रात दिनांक १७/०१/२०२३ ते दिनांक २०/०१/२०२३ या कालावधीत गोळीबार सरावाद दरम्यान प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केलेला आहे. 
त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा व इतका मैदान जवळील भागातील नागरिकांना सुचित करण्यात येते की गोळीबार सरावा दरम्यान नागरिकांनी फायरबट परिसरात फिरू नये गुरे चारणारे गुराखी यांनीही या भागात येऊ नये तसेच माननीय जिल्हा दंडाधिकारी नंदुरबार यांनी जाहीर केलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे व पोलीस दलास सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments

|