Header Ads Widget


अहिंसा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी दोंडाईचा येथे कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित.


अहिंसा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी दोंडाईचा येथे कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित. 




दोंडाईचा! Dondaicha/ LivenationNews 



अहिंसा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी दोंडाईचा येथे कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री अतुल कुलकर्णी आणि श्री सागर भाले उपस्थीत होते. 
हा कार्यक्रम  17 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित केला गेला. 


कार्यक्रमात संवाद, गट चर्चा, मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, देहबोलीचा तसेच आत्मविश्वास बद्दल मार्गदर्शन देण्यात आले. अहिंसा डी. फार्मसी व बी. फार्मसी च्या अंतिम वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व अगदी उत्कृषटरित्या तो आत्मसात केल्या.


श्री अम्मृत कुलकर्णी व  श्री सागर भालेर यांनी वेगवेगळ्या क्रिया करून तसेच विविध प्रकारचे  खेळ खेळवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अहिंसा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचे संचालक श्री राजेश मुनोत, प्राचार्य डॉ. दिलीप पाटील, उपप्राचार्य परेश पाटील  आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थीत होते.


प्राचार्य डॉ दिलीप पाटील यांनीही कौशल्य विकासाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा जयस्वाल यांनी केले पायल जयस्वाल यांनी आभार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी प्राध्यापक मयूर देसले व विनीत खैरनार यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments

Today is Sunday, May 11. | 10:05:1 AM