Header Ads Widget


नगरपंचायत वर भाजपा ची सत्ता आणल्याबद्दल साक्रीकर जनतेचे आभार मानले..


    

साक्री! Sakri LivenationNews  
प्रतिनिधी /अकील शहा


-: साक्री नगरपंचायत एक वर्ष पूर्णत्वाचे:-

साक्री नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना साक्रीकर मायबाप जनतेने बहुमताने निवडून दिले. चाळीस वर्षे सत्ता भोगलेल्या सत्ताधाऱ्यांना आसमान दाखवले. भूतो ना भविष्य असा निकाल साक्रीकर मायबाप मतदारांनी दिला. या निकालास एक वर्ष पूर्ण झाला आहे. एक वर्ष पूर्णत्वाच्या औचित साधून मी शैलेंद्र आजगे साक्रीकर जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. निवडणुकीदरम्यान मतदारांना जे आश्वासन भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले होते. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी बहुमताने निवडून आलेले नगरसेवक व नगरसेविका हे सदैव प्रयत्नशील आहेत. तसेच माझ्याकडे नगरसेवक हे पद नसले तरी देखील मी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील आहे. भारतीय जनता पार्टीतील निवडून आलेले नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष सर्व समितीचे सभापती तसेच नगरसेवक व मी शैलेंद्र आजगे आपल्या सर्व मायबाप मतदारांचे आम्ही आभार व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपण दिलेला कौल हा ऐतिहासिक असून या संधीचे सोने आम्ही सर्व पदाधिकारी नक्कीच करू, पुढील काळात साक्री शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे भरीव योगदान राहील अशी आपणास खात्री देतो... 
     पुन्हा आपण दिलेल्या पाठबळाला नतमस्तक होवून आपणांस धन्यवाद देतो...


    शुभेच्छुक....

   श्री शैलेंद्र भगवान आजगे
जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी
सहसंयोजक, पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments

|