शहादा ! Shahada /LivenationNews
प्रतिनीधी/शेख मुजाहीद
इंकलाब ब्रिगेड तर्फे रस्त्यावर फिरणाऱ्या वेडसर तरुणांची काळजी घेतली जात आहे. इंकलाब ब्रिगेड या नावातच काहीतरी नवीन करण्याची व करवून घेण्याची क्षमता आहे. केवळ समाजसेवा घडावी वंचित अपेक्षित घटक यांना उपयोगी वस्तूचे वाटप ,त्यांची निगा ठेवणेसाठी सातत्याने धडपड होत असते. ही घटक समाज प्रवाहात जुडावी यासाठी प्रयत्न सुरू असतो. आपण समाजाचे देणे लागतो हा उद्दात हेतू लक्षात घेत समाज सेवेचे कार्य नियमित सुरू असते.
अश्या उपक्रमाअंतर्गत शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या वेडसर तरुणांची काळजी घ्यावी अश्या उद्देशाने त्या वेडसर तरुणांची स्वतः आंघोळ घालण केस कापणे त्यांना नवीन कपडे चप्पल देणे. जेवण खाऊ घालने. जेणे करून अशी व्यक्ती समाजव्यवस्थेला पूरक होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
नुकताच एका अपघातात गुजरात राज्यातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अश्या घटना होवू नये म्हणून इंकलाब ब्रिगेड तर्फे हायमस्ट दिवे बसविले. त्यांचा अश्या विविध समाजकार्या चे सर्वत्र कौतुक होत आहे. या व अशा कामात संदीप राजपाल सोबत त्यांचे सर्व सहकारी मदत करत आहेत.
0 Comments