Header Ads Widget


वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी

LiveNationNews Bulletin


नागपूर शहर , दि. २३.०१.२३

फिर्यादी हे त्याचे वडीलांचे उपचाराकामी राठी हाॅस्पीटल धंतोली येथे आलेले होते. त्यांनी त्यांची होंन्डा क्रेटा कार क्र. एमपी 28 सीबी 5006 किं.अं. 6,68,000/-रु ही साठे यांचे घरा समोर रोडवर, धतोली येथे लावुन लाॅक करुन ठेवलेली होती. कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेली अषा फिर्यादिचे रिपेार्टवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हयात आरोपीतांनी बलेनो कार क्रं. आर.जे 02 सिजी 0839 ही वापरल्याचे निष्पन्न झाले व नमुद गाडी ही जि. अलवर राजस्थान येथील असल्याची माहीती मिळाली. त्याआधारे पथकाने जि. अलवर राजस्थान येथे जावुन आरोपीना ताब्यात घेतले तसेच त्याचेकडुन गुन्हयात वापरलेली नमुद गाडी जप्त करण्यात आली. आरोपींनी चोरी केलेली क्रेटा कार क्र. एमप 28. सिबी .5006 बनारस येथे नेवुन विकलेली असल्याचे सांगितले आहे. आरोपी क्र. 1 याचेवर विविध ठिकाणी एकुण 25 कारचोरीची गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली आहे. आरोपींकडुन 1) गुन्हयात वापरलेली बलेनो गाडी क्र. आर.जे 02 सिजी 0839 किं.अं. 8,00,000/-रु, 2) तिन मोबाईल किं.अं. 20,000/-रु, 3) वेगवेगळया कंपनीच्या कारच्या एकुण 7 स्मार्ट की कि.अं. 40,000/-रु असा एकुण 8,60,000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरील वरिष्ठांचे मार्गदर्षनाखाली पोउपनि. अनिल इंगोले, बलराम झाडोकर व टिम (सायबर सेल), पोहवा. नामदेव टेकाम, दिपक रिठे, नापोअं. विलास कोकाटे पंकज हेडाऊ, पो.अं. कपीलकुमार तांडेकर अभय ढोणे यांनी केली.

Post a Comment

0 Comments

|