महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यातील बेडकी गावाजवळ तपासणी नाका असून परराज्यातून येणाऱ्या वाहनांची येथे तपासणी केली जाते. यात ओवरलोड किंवा विनापरवाना अवैध वाहतूक करत असलेल्या वाहनांवर कारवाई करून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. परंतु नवापूर तालुक्यातील बेडकिपाडा तपासणी नाक्यावर ओवरलोड अवजड वाहनांकडुन अवैधरीत्या वसुली करून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत परंतु आत्ता पर्यन्त शासनाकढून कोणत्याही ठोस कारवाई दिसत येत नाही . शासनाचा महसूल बुडवणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचार्यांवर केव्हा मोठी कारवाई होणार आहे. असे प्रश्न उपस्तीत होत आहे. मोटार वाहन निरीक्षक यांनी स्वतःचे पंटर PUC ऑपरेटर च्या नावावर (खाजगी सुरक्षा रक्षक) ठेवलेले असून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वसुली केली जाते. वाहनचालकांकडून अमाप पैशांची मागणी केली जाते पैसे दिले नाही तर पंटरद्वारे वाहनचालकांना मारहाण केली जात असल्याची तक्रार वारंवार येत आहे. आता प्रशासन यावर काय कार्यवाही करेल ? जनतेचे लक्ष लागून आहे खाजगी पंटर हटतील का ??
लाईव्ह नेशन न्यूजची टीम समक्ष भेट देऊन पाहणी केलेली आहे अनेक ओवरलोड वाहन दिसत होते परंतु कारवाई कमी. अधिकारिंना विचारल्यावर उडाउडीचे उत्तर देऊन दिशा भूल करण्याचे प्रयत्न केले जात होते आणि त्याठिकाणी उपस्तीत खाजगी पंटर दमदाटी करून अंगावर येत होते.
हजारपेक्षा वाहनांची ये–जा मात्र कारवाई कमीच
तपासणी नाक्यावरून एका दिवसातून एक हजार पेक्षा अधिक अवजड वाहनांची ये-जा असते परंतु परिवहन विभागाद्वारे करण्यात आलेली कारवाई नगण्य आहे. गेल्या सहा महिन्यातील कारवाईची आकडेवारी पाहता महामार्गावरुन जाणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांची संख्या जास्त आहे, परंतु या ठिकाणी कार्यरत असलेल्या खाजगी सुरक्षारक्षकाद्वारे क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे वाहन भरलेले आढळल्यास कमी वजनाची पावती देऊन अवैध वसुली होत असल्याचे प्रकार दिसून येत आहे..
0 Comments