Header Ads Widget


नारी-शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन आनंदोत्सवाने साजरा करण्यात आला .

नांदेड!Nanded/LivenationNews\

28/01/2023 रोजी नारी -शक्ति सेवा फाउंडेशनच्या कार्यालयावर हर्षोल्लासाने प्रजासताक दिवस साजरा करण्यात आला. नारी-शक्ती सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कु.सुमय्या अली यांच्या हस्ते भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण पार पडले तसेच कार्यक्रमाला उपस्थित,

सगळया लोकांनी तिरंगेला सलामी दीली. राष्ट्रीय गीत गायन व प्रस्तुत करण्यात आले. या वेळी कु. सुमय्या अली यांनी गणतंत्र दिवसाच्या महत्व, संविधानिक अधिकार व प्रजासत्ताक दिनाच्या विविध विषयांवर लोकांपुढे योग्य मनोगत केले.
२६ जानेवारी सकाळपासुन देशभक्तिच्या गीतांनी  सर्व परिसर दुमदुमले होते, या वेळी शाळकरी मुलांनी आप- आपली संस्कृतिने देशभक्तिच्या गीतावर डांस कला व नृत्य प्रस्तुत केले.

तसेच या कार्यक्रमाच्या वेळी कु.सुमय्या अली यांचा शॉल ,श्रीफल आणि फुलांचा हाराने सत्कार करण्यात आले. या वेळी  कु.सुमय्या अली यांच्या हस्ते ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवरांना अल्पोपाहार आणि मिठाई चे वितरण करण्यात आले. या वेळी शाळकरी मुले- मुली, महिला व पुरुष बहुसंख्यने उपस्थित होते, तसेच या वेळी उपस्थित पदाधिकारी व बहुसंख्य महिला,
कु.सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी- शक्ति सेवा फाउंडेशन, नारी शक्ति  चित्राताई, नारी शक्ति आकांक्षा यादव, नारी शक्ति अदिति मेश्राम, नारी शक्ति शीतल, नारी शक्ति स्वती ,नारी शक्ति गंगाताई, इजहार अल्लाह बेग आदि पदाधिकारी उपस्थित होते व कार्यक्रम संपन्न करण्यात सर्व उपस्थितांचे मोलाचे योगदान राहिले.

नारी-शक्ती सेवा फाउंडेशन तर्फे असेच वेगवेगळे उपक्रम राबवून, तळागाळातील समाजाला आपले हक्काचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, एकता, रोजगार अशा अनेक उद्देशाने नवनवीन उपक्रम सामाजिक कार्यासाठी राबवावे व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा उपस्थित लोकांकडून देण्यात आल्या. कार्यक्रमाला सर्व उपस्थितांचे नारी-शक्ती सेवा फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष कु.सुमय्या अली यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

|