Header Ads Widget


खाकीचा धाक दाखविताच कापूस चोरांनी चोरी केल्याची दिली कबुली;साक्री पोलिसांची कारवाई

LiveNationNews Bulletin

साक्री : साक्री तालुक्यातील शेतशिवारातून कपाशी  चोरणारी टोळी साक्री पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातील पाचही सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून ३० क्विंटल कापूस हस्तगत करण्यात आला आहे. या चोरट्यांकडून सहा गुन्ह्याची उकल करण्यास साक्री पोलिसांना यश आले आहे.

कपाशी चोरांची टोळी साक्री पोलीस ठाणे हद्दीत सन २०२२ मध्ये अष्टाणे, कावठे, शेवाळी(दा)आणि कासारे गाव परिसरात शेतकर्‍यांनी कापुस वेचणी करुन त्यांचे शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला असतांना अज्ञात चोरटयांनी वेगवेगळया शेतातुन कापुस चोरुन नेला. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी पथक तयार करीत अज्ञात चोरटयांचा कसून शोध सुरू केला.

तपासादरम्यान कापुस चोरी करणार्‍या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांनी साक्री हद्दीतुन अटक केल्याची माहिती मिळाली. हे चोरटे नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात असतांना त्यांनी नंदुरबार व साक्री तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी कापुस चोरी केली असल्याची कबुली देऊन नंदुरबार पोलिसांकडे त्यांच्याकडील गुन्ह्यातील कापसाची रिकव्हरी दिली होती. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दिलीप किशोर भिल (रा. तलवाडे बु ता.जि.नंदुरबार), सुरेश रामलाल माळीच (रा.कोकले ता.साक्री), जगदीश राजु माळचे, प्रमोद सुकदेव शिवदे व सुनिल बापु मरसाळे तिघे (रा. कावठे ता.साक्री) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अष्टाणे, कावठे, शेवाळी(दा), कासारे परिसरात कापुस चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून साक्री पोलिस ठाण्यात दाखल सहा गुन्ह्यातील एकुण त्याची २ लाख ४० हजार रूपये किंमतीचा ३०क्विंटल कापुस हस्तगत करण्यात आला. ही कारवाई साक्री पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्यासह पोसई बी.बी नर्‍हे, पोसई आर.व्ही.निकम, पोहेकॉ एस.जी.शिरसाठ, के.आर.पाटील, डी.आर.कांबळे, एन.डी.सोनवणे, व्ही.ए.देसले, पोना एस.एस.सावळे, शांतीलाल पाटील, पोकॉ तुषार रमेश जाधव, जे.वाय.अहिरे, सुनिल अरुण अहिरे, सी.डी.गोसावी, प्रमोद जाधव, चेतन अढारे व जी.ए.शेख यांनी केली.

Post a Comment

0 Comments

|