अक्कलकुवा! Akkalkuwa/LivenationNews
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित,महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयात तळोदा राष्ट्रीय सेवा योजना विभागच्या एककाने विशेष हिवाळी श्रम-संस्कार शिबिराचे (ता.२७) ते (ता.०२) फेब्रुवारी या कालावधीत सातपुडयाच्या पायथ्याशी असलेले गाव धवलीविहीर या गावातील जि.प.च्या उच्च प्राथमिक शाळेेच्या आवारात आयोजित करण्यात आले आहे.या सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक सुभाष पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भरत माळी,तसेचसंस्थचे उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.उषा वसावे यांची विशेष उपस्थिती होती. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.माधव कदम,प्रा.डॉ. प्रशांत बोबळे लाभले.
प्रसंगी धवळीविहिर लोकनियुक्त सरपंच सपना वसावे,मुख्याध्यापक प्र.भा.वळवी,प्रा.डॉ.प्रमोद जाधव,प्रा.नितीन तायडे,एम.एस. डब्ल्यू,बी.एस.डब्ल्यू वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र परदेशी व आभार प्रदर्शन प्रा.निलेश गायकवाड यांनी केले.
0 Comments