LiveNationNews Bulletin
रायगड, दि. २५/०१/२०२३.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत महिला फिर्यादी व 04 आरोपी सर्व हे एकाच गावातील शेजारी राहणारे आहेत फिर्यादी हया साईबाबा मंदीरात दर्शनासाठी जात असताना आरोपीत नं.01 ते 04 हे त्यांचे ओटीवर बसुन ते फिर्यादी यांचे पतीचे नाव घेवुन यास ठेचुन मारायला पाहीजे असे बोलुन शिवीगाळ करीत असताना सदरचा प्रकार फिर्यादी यांनी ऐकुन माझे नव-याला शिवीगाळी का करता याबाबत आरोपीत यांना जाब विचारला असता त्या गोष्टीचा आरोपीत नं.01 ते 04 यांना राग येवुन त्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना हाताबुक्याने मारहाण करीत असताना सदरचा प्रकार बघुन फिर्यादी यांचा मुलगा शेजारी राहणारे साक्षीदार हे सोडविणेस गेले असता आरोपीत नं.01 याने फिर्यादी यांच्या मुलाला डोक्यात दगड मारून गंभीर स्वरूपाची जबर दुखापत केली तसेच आरोपीत नं.02 याने फिर्यादी यांचा दुसरा मुलगा यास विटेने आरोपीत नं.03 याने साक्षीदार यास काठीने तसेच आरोपीत नं.04 यांचेसह हाताबुक्याने मारहाण करून पुन्हा जीवे ठार मारणेची धमकी दिली. सदर गुन्ह्यातील 03 आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसई/श्री.जालिंदर पवार हे करीत आहेत.
0 Comments