Header Ads Widget


मनात राग ठेवून मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

LiveNationNews Bulletin

रायगड, दि. २५/०१/२०२३.
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत येथे फिर्यादी हे रस्त्याने जात असताना आरोपीत क्रमांक 01 याने ग्रामपंचायत ऐनघरचे काढण्यात आलेल्या टेंडरवरून साक्षीदार याचे सोबत भांडण होवून सदरचे भांडण सोडविणेकरीता फिर्यादी हे तेथे गेले होते व त्यांनी देखील फिर्यादी यांच्या वडीलांना मारहाण केली होती या गोष्टीचा राग मनात धरून त्याने फिर्यादी व साक्षीदार यांना पाहून शिवीगाळ करू लागल्याने त्याविषयी आरोपीत याचेकडे विचारणा केली असता आरोपीत क्रमांक 01 ते 06 सर्व आपसात संगनमत करून फिर्यादी यांना हाताबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी करून फिर्यादी यांची शर्ट व बनियन फाडून व साक्षीदार यांचे छातीत हाताबुक्क्याने मारून त्यांचे शर्टची बटणे तोडली.
याबाबत नागोठणे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोह/1146 गणेश भोईर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|