Header Ads Widget


१६ इसमांवर मुंबई परिमंडळ ६ येथे तडीपार कारवाई.

LiveNationNews Bulletin

मुंबई शहर, दि. २५/०१/२०२३.
परिमंडळ 6 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची टोळी, सराईत गुन्हेगार तसेच शिक्षा भोगून आलेले आरोपीत यांचेवर पोलीस ठाणे स्तरावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असता देखील सदर प्रकारचे अपराधी कृत्य, सदरची टोळी व सराईत गुन्हेगार हे वारंवार करीत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरसीएफ, चुनाभट्टी, शिवाजीनगर, मानखुर्द व टिळकनगर यांनी त्यांचे विरोधात तडीपारीचा प्रस्ताव परिमंडळ 6 कार्यालयास सादर करण्यात आला असता, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 6, चेंबूर, मुंबई यांनी 16 इसमांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55, 56 व 57 अन्वये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्हयांचे हद्दीतून हद्दपार केले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणेचे हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारी टोळी प्रमुख व सदस्य सद्दाम सईद अहमद खान, इम्तियाज जमाल खान उर्फ टिपू, मोहमद फैजान उर्फ जंगली मो आयुब शेख, मोहमद अजिम मोहमद जहांगीर गाझी, जमीर अमिन खान यांस 04 महिने, मानखुर्द पोलीस ठाणेचे इरशाद रौफ अहमद शेख व निसार रब्बानी अन्सारी यांस 12 महिने, आरसीएफ पोलीस ठाणेचे गोविंद रामचंद्र गुप्ता उर्फ बबलू, सिमरनजित सिंग आत्मासिंग उर्फ काका व राहुल विकास काताळकर उर्फ राहुल्या यांस 15 महिने कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये हद्दपार करण्यात आले आहे.
कलम 56 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये शिवाजी नगर पोलीस ठाणेचा सराईत गुन्हेगार आसीफ साबीर शेख उर्फ रोमियो यास दोन वर्षे, चुनाभट्टी पोलीस ठाणेचा सराईत गुन्हेगार जयेश उर्फ झुंगरू सुरेंद्र भंडारे यास दोन वर्षे, टिळकनगर पोलीस ठाणेचा सराईत गुन्हेगार मुरगन कृष्णास्वामी मुपनार यास दोन वर्षे, आरसीएफ पोलीस ठाणेचा सराईत गुन्हेगार राहुल ईश्वर राठोड यास दोन वर्षे हद्दपार करण्यात आले आहे.
कलम 57 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये शिक्षा भोगून आलेला आरसीएफ पोलीस ठाणेचा आरोपी रविंद्र कडू उर्फ नाडू यास एक वर्षे व चुनाभट्टी पोलीस ठाणेचा आरोपी तुहीद इजहार अहमद शेख यास दोन वर्षे हद्दपार करण्यात आले आहे.
सदर कारवाई परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुशंगाने करण्यात आली आहे. सदर हद्दपार इसमांनी मुंबई उपनगर परिसरात विनापरवानगी प्रवेश केल्यास त्यांचेविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, सदरील हद्दपार इसम मुंबई उपनगर हद्दीत दिसून आल्यास संबंधितांनी त्याबाबत पोलीसांना माहिती दयावी तसेच अवैध्य धंदे व बेकायदेशीर कृत्ये करणारे तसेच सराईत गुन्हेगार यांचे विरूध्द भविश्यात देखील अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments

|